महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आव्हान उत्पन्न वाढविण्याचे… जीएसटीच्या संकलनात जुलैमध्ये घसरण - GST Latest news

सरकारने 5 कोटींहून कमी उलाढाल असलेल्या उद्योगांना कर भरण्यासाठी सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळेही जीएसटीचे संकलन कमी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संग्रहित - जीएसटी
संग्रहित - जीएसटी

By

Published : Aug 1, 2020, 6:04 PM IST

नवी दिल्ली – वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात जूनमध्ये घसरण झाली आहे. जुलैमध्ये जीएसटीचे 87 हजार 422 कोटी रुपयांचे संकलन झाले आहे. तर जुनमध्ये 90 हजार 917 कोटी रुपयांचे जीएसटीचे संकलन झाले होते.

जीएसटीचे जूनमध्ये संकलन कमी झाले असले तरी चालू वर्षातील मे आणि एप्रिलच्या तुलनेत अधिक जीएसटीचे संकलन झाले आहे. मे महिन्यात 62 हजार 9 कोटी रुपयांचे जीएसटीचे संकलन झाले होते. तर एप्रिलमध्ये 32 हजार 294 कोटी रुपयांचे जीएसटीचे संकलन झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

असे आहे जुलै महिन्यातील जीएसटीचे संकलन

  • केंद्रीय जीएसटी - 16,147 कोटी रुपये
  • राज्य जीएसटी - 21,418 कोटी रुपये
  • एकत्रित जीएसटी (आयात करण्यात येणाऱ्या उत्पादनांवरील करांसह) - 42,592 कोटी रुपये
  • उपकर - 7,265 कोटी रुपये

गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत यंदा जुलैमध्ये 86 टक्के जीएसीटीचे संकलन झाले आहे. असे असले तरी जून महिन्यातील जीएसटीचे संकलन हे जुलैहून अधिक होते, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

मार्च आणि एप्रिल 2019 मध्ये केंद्र सरकारने दिलासादायक घोषणा केल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारीत मोठ्या प्रमाणात करदात्यांनी जूनमध्ये सरकारकडे जीएसटी जमा केला होता. सरकारने 5 कोटींहून कमी उलाढाल असलेल्या उद्योगांना कर भरण्यासाठी सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे जीएसटीचे संकलन कमी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details