नवी दिल्ली- मार्चमध्ये जीएसटी १. ०६ लाख कोटी महसूल गोळा झाला आहे. गेल्या काही महिन्यात जीएसटीचे दर कमी करण्यात आले आहेत. तरीही जीएसटी महसुलात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
मार्च २०१९ मध्ये एकूण १ लाख ६ हजार ५७७ कोटींचा जीएसटी महसूल गोळा झाला आहे. यामध्ये केंद्रीय जीएसटीचे प्रमाण हे २० हजार ३५३ कोटी आहे. तर राज्यांचा जीएसटी हा २७ हजार ५२० कोटी आहे. तर इंटिग्रेटेड जीएसटी हा ५० हजार ४१८ कोटी आहे.
जीएसटीचे अंमलबजावणी केल्यापासून सर्वात अधिक महसूल मार्चमध्ये गोळा झाला आहे. मार्च २०१८ च्या तुलनेतमार्च२०१९ मध्येजीएसटीच्या महसुलाच्या प्रमाणात १५.६ टक्के वाढ झाली आहे.