महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

ऑगस्टमध्ये ८६ हजार ४४९ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन; गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांची घसरण

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ९८ हजार २०२ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. गतवर्षी ऑगस्टच्या तुलनेत यंदा ऑगस्टमध्ये जीएसटीच्या संकलनात १२ टक्क्यांची घसरण झाली आहे.

जीएसटी
जीएसटी

By

Published : Sep 1, 2020, 7:17 PM IST

नवी दिल्ली - चालू वर्षात ऑगस्टमध्ये एकूण ८६ हजार ४४९ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. तर जुलैमध्ये ८७ हजार ४२२ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते, असे केंद्रीय वित्त मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ९८ हजार २०२ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. गतवर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत यंदा ऑगस्टमध्ये जीएसटीच्या संकलनात १२ टक्क्यांची घसरण झाली आहे.

असे आहे ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन

  • केंद्रीय जीएसटी- १५ हजार ९०६ कोटी रुपये
  • राज्य जीएसटी- २१ हजार ६४ कोटी रुपये
  • एकत्रित जीएसटी- ४२ हजार २६४ कोटी रुपये
  • उपकर - ७ हजार २१५ कोटी रुपये

जीएसटीचे प्रमाण कमी होत असल्याने राज्यांना कर्जाचा केंद्र सरकारने दिला पर्याय -

राज्यांना जीएसटी मोबदला देण्याबाबत केंद्रीय वित्त सचिव अजय भूषण पांडे यांनी राज्यांना शनिवारी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राज्यांना आरबीआयकडून सुरू करण्यात येणाऱ्या विशेष खिडकीतून अथवा बाजारातून कर्ज घेण्याचे सूचविले आहे. केंद्र सरकारच्या अंदाजित आकडेवारीनुसार राज्यांना देण्यासाठी २.३५ लाख कोटी रुपयांचा जीएसटी मोबदला देण्यात अडचण येणार आहे. त्यापैकी ९७ हजार कोटी रुपये हे जीएसटी अंमलबजावणीतील कमतरतेमुळे मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर उर्वरित जीएसटी मोबदला हा कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने राज्यांना मिळणे कठीण होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details