हैदराबाद- भारताने 'वस्तू व सेवा करा'ची (जीएसटी) केलेली सुधारणा हा '२१ व्या शतकामधील सर्वात मोठा वेडेपणा' असल्याची घणाघाती टीका भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. देशाला २०३० पर्यंत महाशक्ती करण्यासाठी वार्षिक १० टक्के विकासदर गाठावा लागणार असल्याचेही सुब्रमण्यम यांनी सांगितले. ते प्रज्ञा भारतीने आयोजित केलेल्या 'भारत २०३० पर्यंत आर्थिक महाशक्ती'च्या कार्यक्रमात बोलत होते.
दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार द्यावा, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. नरसिंह राव यांनी त्यांच्या काळात सुधारणा केल्या आहेत. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, देशाने आठ टक्क्यांचा विकासदर वेळोवेळी गाठला आहे. मात्र, काँग्रेस सरकारने सुधारणा केल्यानंतर विकासदर गाठला नव्हता.
पुढे ते म्हणाले, की (विकासदर) ३.७ टक्के असल्याने कसे होणार? आपल्याला पहिल्यांदा भ्रष्टाचाराविरोधात लढाई आणि दुसऱ्यांदा गुंतवणुकदारांना बक्षीस देण्याची गरज आहे. प्राप्तिकर आणि जीएसटीने गुंतवणूकदारांना दहशतीत ठेवू नका.