दावोस - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (डब्ल्यूडब्ल्यूईएफ) प्रमुख ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी भारताच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्था हा तात्पुरता परिणाम दिसत असल्याचे म्हणाले. येत्या काळात देशाची अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. त्या 'डब्ल्यूडब्ल्यूईएफ २०२०' मध्ये बोलत होत्या.
आयएमएफने 'जागतिक आर्थिक दृष्टीक्षेप' हा अहवाल ऑक्टोबर २०१९ मध्ये जाहीर केला. त्यामधील अंदाजाच्या तुलनेत जानेवारी २०२० मध्ये जगाची स्थिती चांगली असल्याचे आयएमएफच्या प्रमुख ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी म्हटले. व्यापार तणाव निवळल्यानंतर अमेरिका-चीनमध्ये पहिल्या टप्प्यातील होणारा करार आणि करात होणारी कपात अशी कारणांनी सकारात्मक स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ३.३ टक्के विकासदर हा उत्तम नसल्याचे त्यांनी म्हटले.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प २०२० : अधिक आणि योग्य असा खर्च करा!