महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बुडित कर्जाचे आव्हान; २०२० पर्यंत बँकांचे ८ टक्क्यापर्यंत घसरू शकतात शेअर

येत्या मार्चपर्यंत बँकिंग व्यवस्थेमधील एकूण बुडित कर्जाचे प्रमाण हे ८ ते ८.५ टक्क्यापर्यंत कमी येईल, असा क्रिसिलचा अंदाज आहे. बँकांकडील बुडित कर्जाचे एकूण प्रमाण हे मार्च २०१८ पर्यंत हे ११.५ टक्के होते.

संग्रहित - पैसे

By

Published : Oct 2, 2019, 6:18 PM IST

मुंबई- भारतीय बँकांना बुडित कर्जांचा मोठा फटका बसू शकतो, असा अंदाज क्रिसिल या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे. बुडित कर्जामुळे २०२० पर्यंत बँकांचे शेअर ८ टक्क्यापर्यंत घसरू शकतात, असे क्रिसिलने अहवालात म्हटले आहे.

येत्या मार्चपर्यंत बँकिंग व्यवस्थेमधील एकूण बुडित कर्जाचे प्रमाण हे ८ ते ८.५ टक्क्यापर्यंत कमी येईल, असा क्रिसिलचा अंदाज आहे. बँकांकडील बुडित कर्जाचे एकूण प्रमाण हे मार्च २०१८ पर्यंत हे ११.५ टक्के होते. बँकिंग व्यवस्थेवर बुडित कर्जासह घोटाळ्याचा परिणाम झाला आहे. बँकांमधील वित्तीय पुरवठ्याचा वृद्धीदर हा १२ टक्क्यावर स्थिर राहिल, असा अंदाज क्रिसिलचे सोमाशेखर वेमुरी यांनी व्यक्त केला. सरकारी बँकांचे करण्यात येणारे पुनर्भांडवलीकरण आणि खासगी क्षेत्राच्या आक्रमक व्यवसायाने बँकिंग व्यवस्थेला वेग होणार आहे.

हेही वाचा- सणासुदीला बँका देशभरातील २५० जिल्ह्यात भरविणार 'कर्ज मेळावे'

चालू वर्षात नव्याने होणारी बुडित कर्ज प्रकरणे (स्लिपपेजेस) ही ३ ते ३.५ टक्क्यापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मागील आर्थिक वर्षात नव्याने होणारी बुडित कर्ज प्रकरणे ही ३.८ टक्के एवढी होती. तर आर्थिक वर्ष २०१८ मध्ये अशा कर्जाचे प्रमाण ७.४ टक्के होते. जेव्हा कार्यरत असणारे बँकिंग खाते हे बुडित होते, तेव्हा त्याला नव्याने झालेले बुडित कर्ज (स्लिपपेजेस) असे म्हटले जाते.

हेही वाचा-२१ व्या शतकातील भारतासाठी महात्मा गांधींचे 'हे' आहेत आर्थिक विचार

संकटात सापडेल्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) स्थिती सुधारत असल्याचे क्रिसिलने म्हटले आहे. सध्याच्या घसरलेल्या अर्थव्यवस्थेचा बँकेचे तारण आणि ऑटो कर्ज अशा प्रक्रियांवर कोणताही परिमाम होणार नाही. यामध्ये कधी नव्हे तेवढ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे क्रिसिलने म्हटले आहे.

हेही वाचा-अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी निवड

ABOUT THE AUTHOR

...view details