महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावल्याच्या विधानावरून पियूष गोयल 'ट्रोल'

आल्बर्ट आईन्स्टाईनला गुरुत्वाकर्षणचा शोध लावण्यासाठी गणिताची गरज लागली नव्हती, असे पियूष गोयल यांनी वक्तव्य केले. नेटिझन्सने गोयल यांना ट्रोल करत गुरुत्वाकर्षणाचा शोध आईन्स्टाईनने नव्हे आयझॅक न्यूटनने लावल्याचे म्हटले. तर आईन्स्टाईनने साक्षेपतावादाचा सिद्धांत मांडल्याचे निदर्शनास आणून दिले.

पियूष गोयल

By

Published : Sep 13, 2019, 1:16 PM IST

नवी दिल्ली - गुरुत्वाकर्षणचा शोध आईन्स्टाईनने लावल्याचे वक्तव्य केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी गुरुवारी विधान केले. यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची करताना गणिताचा विचार करू नये, हे सांगताना गोयल यांनी गुरुत्वाकर्षणच्या शोधाचे उदाहरण दिले होते.

आल्बर्ट आईन्स्टाईनला गुरुत्वाकर्षणचा शोध लावण्यासाठी गणिताची गरज लागली नव्हती, असे पियूष गोयल यांनी वक्तव्य केले. नेटिझन्सने गोयल यांना ट्रोल करत गुरुत्वाकर्षणाचा शोध आईन्स्टाईनने नव्हे आयझॅक न्यूटनने लावल्याचे म्हटले. तर आईन्स्टाईनने साक्षेपतावादाचा सिद्धांत मांडल्याचे निदर्शनास आणून दिले.

गणिताच्या आकडेवारीत जावू नका- गोयल
जी टीव्हीवर आकडेवारी दाखविली जाते, त्यामध्ये अडकू नका...जर तुम्हाला ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करायची असेल तर, देशाला १२ टक्के विकासदर गाठावा लागेल. सध्या देशाचा सहा ते सात टक्के विकासदर असल्याचे त्यांनी म्हटले. गणिताच्या आकडेवारीत जावू नका.

हेही वाचा-'बीएमडब्ल्यू'च्या सवारीची हौस करा पुरी; ओलावर आलिशान चारचाकी मिळणार भाड्याने

आईन्स्टाईनला गुरुत्वाकर्षणचा शोध लावताना गणिताची मदत झाली नव्हती. त्याच्याकडे केवळ रचनात्मक सूत्रे आणि गतकाळातील ज्ञान असेल तर ते शक्य नव्हते. मला वाटत नाही, जगभरात तसे कुठेही संशोधन झाले असते. यावेळी त्यांनी गुरुत्वाकर्षणच्या शोधाचे श्रेय आईन्स्टाईन यांना चुकीने देवून टाकले होते.

हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेत महागाईचा भडका, गेल्या १० महिन्यातील सर्वोच्च निर्देशांकाची नोंद

काही दिवसांपूर्वीच निर्मला सीतारामन यांनी नवी पिढी ओला व उबेरचा वापर करत असल्याने वाहन उद्योगांवर परिणाम झाल्याचे वक्तव्य केले होते. जास्त असलेल्या करामुळे वाहन विक्रींची घटलेली संख्या घटल्याचेही त्यांनी नाकारले होते. भारताचा जीडीपी वाढत नाही कारण, ते जीडीपीचे गणित करत नाहीत, अशी एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया देत सीतारामन व गोयल यांच्या विधानावर टीका केली. तर दुसऱ्या वापरकर्त्याने जीडीपी हा ६ टक्के नसून ५ टक्के असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा-लंडन शेअर बाजार खरेदी करण्याची हाँगकाँग शेअर बाजाराकडून ऑफर, 'एवढी' किंमत देणार

भाजप सरकारच्या अधिपत्याखाली प्रशासन हे अपुरे, प्रगल्भ नसलेले आणि अनुभवहीन असल्याची टीका काँग्रेसने बुधवारी केली होती. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी काँग्रेसने टीका केली होती. सीतारामन यांचे वक्तव्य म्हणजे खराब झालेल्या अर्थव्यवस्थेवरील गंभीर विनोद असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details