नवी दिल्ली - जे देश भारतीय उत्पादनांवर उत्पादन शुल्कासारखे अडथळे आणत आहेत, त्यांना प्रत्युत्तर देवू, असा केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी इशारा दिला. अशा देशांची नावे सूचवण्याचे त्यांनी उद्योजकांना आवाहन केले. ते फिक्कीच्या ९२ व्या वार्षिक परिषदेत बोलत होते.
पियूष गोयल म्हणाले, भारताने अधिक स्पर्धात्मक होवून संपूर्ण मूल्य साखळीतील (व्हॅल्यू चेन) प्रश्न सोडविण्याची गरज आहे. यामध्ये डम्पिंग व अयोग्य अनुदानाचा समावेश आहे. वैयक्तिक कंपन्यांचे प्रश्न सोडविण्यावर आमच्या सरकारचा विश्वास नाही. मूळातून प्रश्नाचे विश्लेषण करण्यावर आमचा विश्वास आहे. प्रश्नावर शाश्वत उपाय शोधण्यावर सरकारचा विश्वास आहे.
'भारतीय उत्पादनांच्या निर्यातीत अडथळे आणणाऱ्या देशांना प्रत्युत्तर देवू' - 92nd Annual Convention of Ficci
पियूष गोयल म्हणाले, अधिकारी सुंदर सादरीकरण करून सर्व काही चांगले असल्याची खात्रीने पटवून देतात. दरवेळी अधिकाऱ्याकडून सादरीकरण करताना असा संदेश मिळतो. मात्र, जेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे पाहतो, तेव्हा सर्व काही ठीक नाही, असे दिसते.
'जबाबदार सरकार, ऐकणारे सरकार' हे व्यवसायावर परिणाम करू शकते. तसेच बदल करू शकते, अशा शब्दात त्यांनी कॉर्पोरेट नेत्यांना आश्वसत दिले. कार्यालय आणि उद्योगाचे प्रश्न सोडविण्यासाठी २४X७ कार्यरत असल्याचेही गोयल यांनी सांगितले.
हेही वाचा-दरवाढ थांबेना; केंद्र सरकार तुर्कीमधून १२.५ हजार टन कांद्याची करणार आयात
आंत्रेप्रेन्युअर प्रेरणेला चालना देण्यासाठी सरकार आणि उद्योगाने एकत्र काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. माझे अधिकारी सुंदर सादरीकरण करून सर्व काही चांगले असल्याची खात्रीने पटवून देतात. दरवेळी अधिकाऱ्याकडून सादरीकरण करताना असा संदेश मिळतो. मात्र, जेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे पाहतो, तेव्हा सर्व काही ठीक नाही, असे दिसते. माझा तुमच्यावर विश्वास आहे, आपण एकमेकांमध्ये अधिक बोलण्याची गरज आहे, असे गोयल यावेळी म्हणाले. भारत हा गुंतवणुकीसाठी उत्तम देश असल्याचा त्यांनी पुनरुच्चारही केला.
देशाच्या निर्यातीत सलग चौथ्या महिन्यात घसरण-
भारताच्या निर्यातीत सलग चौथ्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये ०.३४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. पेट्रोलियम, मौल्यवान रत्ने, दागिने आणि कातडी उत्पादनांच्या निर्यातीत घसरण झाल्याने एकूण निर्यातीत घसरण झाली आहे.