महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आरोग्यासह पायाभूत सुविधासाठी १५ हजार कोटी - केंद्रीय अर्थमंत्री

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेजचा पाचवा टप्पा आज जाहीर केला. यामध्ये कोरोनाच्या लढ्यात काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयापर्यंतचा विमा देण्यात येणार आहे.

By

Published : May 17, 2020, 4:07 PM IST

आरोग्य सुविधा
आरोग्य सुविधा

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी १५ हजार कोटींचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. या निधीचा उपयोग कोरोनाच्या लढ्यात आरोग्य सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेजचा पाचवा टप्पा आज जाहीर केला. यामध्ये कोरोनाच्या लढ्यात काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयापर्यंतचा विमा देण्यात येणार आहे.

हेही वाचा-आत्मनिर्भर पॅकेज : कर्ज मर्यादा वाढविल्याने राज्यांना ४.२८ लाख कोटी मिळणार - केंद्रीय अर्थमंत्री

भविष्यात येणाऱ्या कोणत्याही महामारीवर मात करण्यासाठी सार्वजनिक निधी खर्च करण्याचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. सार्वजिक आणि खासगी भागीदारीमधून (पीपीपी) आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेअंतर्गत (आयसीएमआर) राष्ट्रीय प्लॅटफॉर्म तयार करणार आहे.

हेही वाचा-विद्यार्थ्यांकरता डिजीटल शिक्षणाची सुविधा लवकरच होणार लाँच

ABOUT THE AUTHOR

...view details