महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अर्थसंकल्प २०२१: एक सदस्यीय कंपनीलाही मिळणार योजनांचा लाभ - Union Budget Live Updates in Marathi

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ओपीसीसाठी सवलत देण्याची परवानगी दिली आहे. ओपीसीला कोणत्याही भांडवल आणि उलाढालीचे बंधन राहणार नाही. अशा कंपन्यांना कोणत्याही वेळी व कोणत्याही स्वरुपाच्या कंपनीत रुपांतरित करता येणार आहे.

स्टार्टअप
स्टार्टअप

By

Published : Feb 1, 2021, 2:32 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. वन पर्सन कंपनी (ओपीसी) म्हणजे एक सदस्यीय कंपनी असली तरी सरकारकडून सवलत दिली जाणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ओपीसीसाठी सवलत देण्याची परवानगी दिली आहे.

ओपीसीला कोणत्याही भांडवल आणि उलाढालीचे बंधन राहणार नाही. अशा कंपन्यांना कोणत्याही वेळी व कोणत्याही स्वरुपाच्या कंपनीत रुपांतरित करता येणार आहे. भारतीय रहिवाशांना ओपीसीची स्थापना १८२ दिवसांऐजी १२० दिवसांमध्ये करता येणार आहे. तर विदेशात राहणाऱ्या भारतीयांना ओपीसीबरोबर भागीदारी करता येणार आहे. त्यामधून स्टार्टअपला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास निर्मला सीतारामन यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details