नवी दिल्ली- केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत २.६८ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थव्यवहार सचिव अतनु चक्रवर्ती यांनी माध्यमांना दिली. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ३.३ टक्क्यांपर्यंत ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
चालू आर्थिक वर्षात ७.१० लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचे सरकारने अर्थसंकल्पात उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यापैकी ६२.५ टक्के कर्ज एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान घेण्यात आल्याचे चक्रवर्ती यांनी सांगितले.
हेही वाचा-मंदावलेली अर्थव्यवस्था; मुख्य आठ क्षेत्रांच्या उत्पादनात ऑगस्टमध्ये ०.५ टक्क्यांची घसरण
केंद्र सरकारने करात केल्यानंतर कार्पोरेट कर हा ३० टक्क्यांवरून २२ टक्के झाला आहे. कॉर्पोरेट कर सर्वात कमी असताना सरकार वित्तीय तुटीचे उद्दिष्ट कसे पूर्ण करणार, हे विचारले असताना त्यांनी याबाबत अधिक सांगितले नाही. विदेशातील बाजारामधून रोख्यांच्या माध्यमातून कर्ज घेण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला होता. असे कर्ज घेण्याबाबत चक्रवर्ती म्हणाले, विदेशातील बाजारामधून कर्ज घेण्याचे फायदे व तोटे पाहण्यात येत आहे. ही प्रक्रिया खूप दीर्घ आहे. चालू वर्षात केवळ रुपयाच्या बाँडमधून कर्ज घेतले जाणार आहे.
हेही वाचा-स्टेट बँकेची ऑस्ट्रेलियातही शाखा, ठरली पहिली भारतीय बॅंक