महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बीएसएनएलसह एमटीएनएलमध्ये निर्गुंतवणूक नाही; रवीशंकर प्रसाद यांची राज्यसभेत माहिती

बीएसएनएलच्या मालमत्तेमधून २०० कोटी, तर एमटीएनएलच्या मालमत्तेमधून ३०० कोटी संकलीत  करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे रवीशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत सांगितले.

BSNL & MTNL
बीएसएनएल आणि एमटीएनएल

By

Published : Dec 12, 2019, 5:13 PM IST

नवी दिल्ली - बीएसएनलसह एमटीएनएलमध्ये निर्गुंतवणूक करण्याचे सरकारचे कोणतही नियोजन नसल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत सांगितले. तसेच दोन्ही सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विकण्यात येणार नसल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.

बीएसएनएलच्या मालमत्तेमधून २०० कोटी, तर एमटीएनएलच्या मालमत्तेमधून ३०० कोटी संकलीत करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे प्रसाद यांनी राज्यसभेत सांगितले.

हेही वाचा-टेक महिंद्राला ५०० कोटींचे कंत्राट; पिंपरी चिंचवड महापालिकेत राबविणार 'स्मार्ट' तंत्रज्ञान

बीएसएनएल (भारत संचार निगम लि.) आणि एमटीएनएलमध्ये (महानगर संचार निगम लि.) निर्गुंतवणूक करण्याचा कोणताही प्रस्ताव विचारासाठी नसल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले. बीएसएनएलला २०१८-१९ मध्ये १५ हजार कोटींचा तोटा झाला होता. एमटीएनएलची मुंबईसह दिल्लीत सेवा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बीएसएनएल आणि एमटीएनएलचा पॅकेज देण्यासाठी मंजुरी दिली आहे. एमटीएनएलचे बीएसएनएलमध्ये विलिनीकरण झाल्याने उत्पादन खर्चात कपात होणार आहे. तसेच तांत्रिक पायाभूत सुविधा सामायिक करता येणार आहेत.

दरम्यान, बीएसएनएलच्या सुमारे 75 हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) स्वीकारली आहे.

हेही वाचा-सध्याच्या स्थितीत बँकांपुढे आव्हाने निर्माण होण्याची शक्यता - शक्तिकांत दास

ABOUT THE AUTHOR

...view details