नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगांशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. प्रशासन हे सर्व सार्वजनिक संस्थांचे खासगीकरण करण्यासाठी बांधील आहे. ते गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापनाने (डीआयपीएएम) आयोजित केलेल्या खासगीकरण विषयावर बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उद्योगांना आणि व्यवसायांना सहकार्य करण्याचे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, हे व्यवसाय स्वत:चे असावेत अशी अट नाही. कमीत कमी चार रणनीतीचे क्षेत्र राहणार आहे. सार्वजनिक संस्थांचे रोखीकरण आणि आधुनिकीकरण करणे हे केंद्र सरकारचे धोरण आहे. उद्योगांशी सरकारचा काहीही संबंध नाही, असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे.