महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

...म्हणून केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध - साठेबाजी

राजधानीत कांद्याचा दर प्रतिकिलो ४० ते ५० रुपये आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याचा दर प्रतिकिलो २० ते ३० रुपये होता. केंद्र सरकारने गेल्या महिन्यात कांद्याची साठेबाजी केल्यास व्यापाऱ्यांवर  कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता.

संग्रहित - कांदा

By

Published : Sep 13, 2019, 7:33 PM IST

नवी दिल्ली - देशातील कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने निर्यातीवर काहीअंशी निर्बंध घातले आहेत. सरकारने निर्यातीसाठी प्रतिटन ८५० डॉलर एवढी किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. त्यामुळे या आधारभूत किमतीहून कमी दराने कांदा निर्यात करता येणार नाही.

राजधानीत कांद्याचा दर प्रतिकिलो ४० ते ५० रुपये आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याचा दर प्रतिकिलो २० ते ३० रुपये होता. केंद्र सरकारने गेल्या महिन्यात कांद्याची साठेबाजी केल्यास व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता.

हेही वाचा-फेसबुक अविश्वासार्ह पोस्टवर आणणार मर्यादा

प्रमुखत: कांद्याचा पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे कांद्याचा बाजारात कमी पुरवठा होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मदर डेअरीचे विक्री केंद्र असलेल्या सफलमध्ये ए श्रेणीचा कांदा २३.९० रुपये प्रतिकिलो दराने विकण्यात यावा, असा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.

हेही वाचा-आरबीआयकडून ४ ऑक्टोबरच्या पतधोरण निर्णयात पुन्हा व्याजदर कपात होणार : तज्ज्ञांचा अंदाज


किरकोळ बाजारात कांद्यांचे दर ऑगस्टमध्ये ३.२१ टक्क्यांनी वधारले आहेत. देशामधून कांद्याची दरवर्षी १५ लाख टन निर्यात करण्यात येते. दरवर्षी भारतामध्ये कांद्याचे सुमारे १७ ते १८ दशलक्ष टन उत्पादन घेतले जाते.

हेही वाचा-नियामक संस्थेच्या अनिश्चततेने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरला - आयएमएफ

ABOUT THE AUTHOR

...view details