जयपूर - केंद्र सरकारने विविध क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी अर्थसंकल्पाची वाट न पाहता पाऊले उचलली आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन हे गेल्या दोन महिन्यात १ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. येत्या दिवसातही जीएसटी संकलन चांगले राहील, असा विश्वासकेंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. पुढे सीतारामन म्हणाल्या, केंद्र सरकार भाजपची सत्ता असलेली राज्ये आणि भाजपची सत्ता नसलेली राज्ये यामध्ये फरक करत नाही. राज्यांचा निधी हा केंद्र सरकारने रोखून ठेवला नव्हता. राज्यांचा निधी हा १४ व्या वित्तीय आयोगाच्या शिफारसीप्रमाणे देण्यात येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.