महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'आरबीआय रोखे रद्द करणे हा नागरिकांवर क्रूर प्रहार'

आरबीआय रोखे रद्द केल्याने नागरिकांना विशेषत: वरिष्ठ नागरिकांना मोठा धक्का बसल्याचे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. आरबीआय रोखे रद्द करण्याच्या निर्णयाला ठाम विरोध असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.

पी. चिदंबरम
पी. चिदंबरम

By

Published : May 28, 2020, 4:21 PM IST

नवी दिल्ली - आरबीआय रोखे रद्द केल्यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. आरबीआय रोखे रद्द करणे हा नागरिकांवर क्रूर प्रहार असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले.

आरबीआय रोखे रद्द केल्याने नागरिकांना विशेषत: वरिष्ठ नागरिकांना मोठा धक्का बसल्याचे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. आरबीआय रोखे रद्द करण्याच्या निर्णयाला ठाम विरोध असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. आरबीआय बाँड पूर्ववत सुरू करण्यासाठी सरकारकडे मागणी करावी, अशी त्यांनी जनतेला विनंती केली आहे.

हेही वाचा-कोरोनावरील पंतजलीचे आयुर्वेदिक औषध चाचणीपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात

पुढे चिदंबरम म्हणाले, की पीपीएफ आणि बचत ठेवीवरील व्याजदरात कपात झाल्यानंतर आरबीआय रोखे रद्द करणे हा क्रूर प्रहार आहे. यापूर्वीही सरकारने जानेवारी २०१८ मध्ये आरबीआय रोखे रद्द केला होता, याची आठवणही चिदंबरम यांनी करून दिली. प्रखर विरोध केल्यानंतर सरकारने दुसरा रोखे सुरू केला. त्यावरील व्याजदर हे ८ टक्क्यांवरून ७.७५ टक्के केले होते, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-मास्क हीच तुमची नवी ओळख; गुजरातच्या फोटोग्राफने 'असा' शोधून काढला जुगाड

प्रत्येक सरकारवर एक तरी रोखे जोखीमविरहित देण्याचे बंधन आहे. आरबीआय रोखे २००३ पासून होता, अशी चिदंबरम यांनी माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details