नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिगटाची बैठक आज सायंकाळी ५ वाजता केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी होणार आहे. सध्याच्या देशाच्या आर्थिक स्थितीवर बैठकीत चर्चा होणार आहे.
केंद्रीय मंत्रिगटाच्या बैठकीला अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पियूष गोयल, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत २० लाख कोटींच्या पॅकेजचा विविध क्षेत्रांना लाभ मिळवून देण्यावर चर्चा होणार आहे.
कोरोनामुळे संकटात सापडलेल्यांना दिलासा देणे व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकारने २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. याशिवाय केंद्र सरकारने आठ क्षेत्रामध्ये खासगीकरण करण्याची घोषणाही केली आहे. आर्थिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचे सरकारसमोर खरे आव्हान आहे. याबाबत राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने यापूर्वी १८ मे रोजी बैठकीत सविस्तर चर्चा केली आहे.