नवी दिल्ली- देवाने भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवावे, या शब्दात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जीडीपीवरून सरकारला टोला लगावला आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी जीडीपीचा (राष्ट्रीय सकल उत्पन्न) भविष्यात उपयोग होणार नसल्याचे लोकसभेत अजब विधान केले होते.
कर कायद्यातील विधेयकात सुधारणा करण्यासंदर्भात लोकसभेत चर्चा चालू असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी जीडीपीवरून धक्कादायक विधान केले होते. जीडीपीला बायबल, रामायण आणि महाभारतासारखे पाहू नये, असे दुबेंनी म्हटले होते. जीडीपीची १९३४ पासून सुरुवात झाली. त्यापूर्वी जीडीपी नव्हती, असे त्यांनी लोकसभेत चर्चेदरम्यान म्हटले होते.
हेही वाचा-आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू; रेपो दरात कपातीची शक्यता