महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जीएसटीची परिषदेच्या मागील बैठकीकरिता 'उधळपट्टी', गोवा सरकारचे ३.२६ कोटी खर्च

जीएसटी परिषदेची बैठक हिल्टॉन कंपनीच्या पंचतारांकित 'डबल ट्री' या हॉटेलध्ये पार पडली. या हॉटेलमध्ये बैठकीला आलेल्या प्रतिनिधींचे जेवण आणि राहण्याची सोय करण्यात आली होती. त्यासाठी गोवा सरकारचे ५० लाख ६९ हजार ६०० रुपये खर्च झाले. यामध्ये एका रात्रीच्या मुक्कासाठी हॉटेलच्या प्रेसेडन्शियल सूटकरिता तब्बल ५९ हजार ५०० रुपये मोजावे लागले आहेत.

संग्रहित - जीएसटी परिषद

By

Published : Oct 18, 2019, 5:28 PM IST

पणजी - वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची गोव्यातील ३७ वी बैठक चांगलीच खर्चिक ठरल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. या समितीच्या बैठकीच्या आयोजनापोटी गोवा सरकारला ३.२६ कोटी रुपये खर्च मोजावे लागणार आहेत.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी समिती गोव्यात २० सप्टेंबरला पार पडली. या बैठकीच्या खर्चाची माहिती पणजीमधील वकील एअरस रोड्रीगस यांनी गोव्याच्या कर आयुक्तांकडून मागविली. सरकारने परिषदेच्या आयोजनाचे काम स्थानिक इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीला दिल्याचे मिळालेल्या माहिती अधिकारातून समोर आले आहे. एजन्सीने केलेल्या विविध खर्चापोटी गोवा सरकारला १.९५ कोटी रुपयांचे देणे झाले आहे. तर २०० टॅक्सीसाठी गोवा सरकारकडून एजन्सीला ५० लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.

हेही वाचा-अर्थव्यवस्थेला झटका : सप्टेंबरमध्ये वस्तू व सेवा करसंकलनाची १९ महिन्यांतील निचांकी नोंद


गोव्यातील जीएसटी परिषदेला बैठकीला देशातील विविध राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासमवेत महत्त्वाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. जीएसटी परिषदेची बैठक हिल्टॉन कंपनीच्या पंचतारांकित 'डबल ट्री' या हॉटेलध्ये पार पडली. या हॉटेलमध्ये बैठकीला आलेल्या प्रतिनिधींची जेवण आणि राहण्याची सोय करण्यात आली होती. त्यासाठी गोवा सरकारचे ५० लाख ६९ हजार ६०० रुपये खर्च झाले. यामध्ये एका रात्रीच्या मुक्कासाठी हॉटेलच्या प्रेसेडन्शियल सूटकरिता तब्बल ५९ हजार ५०० रुपये मोजावे लागले आहेत. तर इतर अन्न आणि पेयांसाठी १० लाख १६ हजार रुपयांचा खर्च झाला.

हेही वाचा-जीएसटीचे करसंकलन वाढविण्यासाठी सरकारने नेमली समिती

काही महत्त्वाच्या व्यक्तींची पणजीजवळ असलेल्या सिडाडे-डे या पंचतारांकित रिसॉर्टमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. त्यासाठी गोवा सरकारचे ३० लाख रुपये खर्च झाले आहेत.

दरम्यान, वित्तीय तूट वाढत असतानाच जीएसटी करसंकलनाचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच समितीची स्थापना केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये जीएसटीचे २ टक्के कमी संकलन झाले आहे. सप्टेंबरमध्ये ९१ हजार ९१६ कोटी रुपये जीएसटी संकलन झाल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले.

ABOUT THE AUTHOR

...view details