नवी दिल्ली- जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाच्या १ दशलक्ष बॅरलचा रोज पुरवठा होत आहे. हा मागणीहून अधिक होणारा पुरवठा आहे. त्यामुळे खनिज तेलाचे दर कमी राहण्यास मदत होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (आयईए) प्रमुखांनी सांगितले.
आयईएचे कार्यकारी संचाल फथिथ बिरॉल म्हणाले भू-राजकीय घटनांमुळे खनिज तेलाच्या वाढलेल्या किमती उतरल्या आहेत. खनिज तेलाचे मुबलक उत्पादन होत आहे. तर अमेरिका, ब्राझील, कॅनडा, नॉर्वे आणि गुयानामधून पुरवठा होणाऱ्या खनिज तेलाचे प्रमाण अधिक असल्याचे बिरॉल यांनी सांगितले. त्यामुळे खनिज तेलाच्या किमतीबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा-निफ्टीच्या विक्रमी निर्देशांकाची नोंद; मुंबई शेअर बाजार १४७ अंशाने वधारला
इराणने देशातील अमेरिकेच्या सैन्य दलाच्या तळावर हल्ला केल्यानंतर खनिज तेलाचे दर गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक वाढले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सकारात्मक संदेश दिला. त्यानंत मध्यपूर्वेतील तणाव निवळला आहे. खनिज तेलाच्या किमती अस्थिर असल्याने
देशासाठी मोठी चिंताजनक बाब असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले. दरम्यान, भारत हा खनिज तेलाची आयात करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पेट्रोल-डिझेलची सतत दरवाढ सुरुच राहिल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे.
हेही वाचा-चंदा कोचर यांची ७८ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीकडून मनीलाँड्रिगप्रकरणी कारवाई