महाराष्ट्र

maharashtra

'जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर चालू वर्षात ४ टक्क्यांनी वाढेल'

By

Published : Jan 6, 2021, 8:30 PM IST

Updated : Jan 7, 2021, 8:49 PM IST

जागतिक बँकेने 'ग्लोबल इकॉनॉमिक प्रोस्पक्ट्स' प्रसिद्ध केला आहे. धोरणकर्त्यांनी कोरोना महामारीचा प्रभाव कमी करण्यासाठी गुंतवणूक वाढविण्यासाठी सुधारणा केल्या नाही तर त्याचा विकासदरावर परिणाम होईल, असा जागतिक बँकेने अंदाज व्यक्त केला आहे.

जागतिक बँक न्यूज
जागतिक बँक न्यूज

वॉशिंग्टन- चालू वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर हा ४ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज जागतिक बँकेने केला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण चांगले झाले तर हा विकासदार वाढेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

जागतिक बँकेने 'ग्लोबल इकॉनॉमिक प्रोस्पक्ट्स' प्रसिद्ध केला आहे. धोरणकर्त्यांनी कोरोना महामारीचा प्रभाव कमी करण्यासाठी गुंतवणूक वाढविण्यासाठी सुधारणा केल्या नाही तर त्याचा विकासदरावर परिणाम होईल, असा जागतिक बँकेने अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा-जागतिक बँकेने ग्राहकांना केले सावध; ही काळजी घेण्याची सूचना

  • कोरोना महामारीचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.
  • चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर हा ९.६ टक्क्यांनी घसरेल, असा अहवालात अंदाज केला आहे. त्याचा कौटुंबीक खर्चासह खासगी गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे.
  • चालू वर्षात दक्षिण आशियाचा विकासदर ३.३ टक्क्यांनी वाढेल, असा जागतिक बँकेने अंदाज केला आहे.
  • रोजगार, उत्पन्न आणि सेवा क्षेत्रात कमी वृद्धीदर होणार आहे.
  • कोरोनाची लस दक्षिण आशियात दुसऱ्या सहामाहीत मोठ्या प्रमाणात देण्यात येईल, असा अहवालात अंदाज केला आहे.
  • कोरोनामुळे कॉर्पोरेटमध्ये दिवाळखोरीसह विविध क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. तसेच देशांतर्गत बँकांवर परिणाम होईल, असेही जागतिक बँकेने म्हटले आहे.

हेही वाचा-भारताची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत; चालू वर्षात ९.६ टक्के जीडीपी घसरण्याचा अंदाज

Last Updated : Jan 7, 2021, 8:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details