नवी दिल्ली- स्वदेशातील कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तू सणानिमित्त लोकांनी भेट म्हणून द्याव्याक, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी केले. त्यामुळे देशातील स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल. ही महात्मा गांधींना योग्य आदरांजली ठरेल, असेही गोयल म्हणाले. ते २० व्या 'हुनर हाट' कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
'स्वदेशी उत्पादने सणांना भेट द्या.. ही महात्मा गांधींना आदरांजली ठरेल' - swadeshi
पियूष गोयल म्हणाले, आगामी तीन वर्षे २०२२ पर्यंत स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे लोकांनी व्रत करावे.
!['स्वदेशी उत्पादने सणांना भेट द्या.. ही महात्मा गांधींना आदरांजली ठरेल' Piyush Goyal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6060767-thumbnail-3x2-asd.jpg)
पियूष गोयल
दबाव असतानाही आयात करण्यात येणाऱ्या अगरबत्तीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील अगरबत्ती उत्पादकांना चालना मिळणार आहे. यावेळी केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री हरदिप पुरी आणि भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.
हेही वाचा-कोरोनाच्या भीतीचे सावट; स्पेनमधील 'मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२०' रद्द