नवी दिल्ली - भारतामधील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जर्मनी महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे जर्मनीच्या अन्न आणि कृषी मंत्री जुलिया क्लॉकनेर यांनी म्हटले. जर्मनी ही शेतीतंत्र आणि पीक लागवडीनंतर व्यवस्थापनात पारंगत असल्याचेही क्लॉकनेर यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना बैठकीमध्ये सांगितले.
जर्मनीचे अन्न आणि कृषी मंत्री जुलिया क्लॉकनेर यांनी देशाचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये कृषी क्षेत्राशी निगडीत विविध विषयावर चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी कृषी बाजारपेठेच्या विकासात सहकार्य करण्यासाठी करार केला आहे.