नवी दिल्ली - देशातील पेट्रोलच्या किंमती प्रति लिटर १५ ते १६ पैशांनी वाढल्या आहेत. तर डिझेलच्या किंमती १७ ते १८ पैशांनी वाढल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची दरवाढ सुरूच राहिल्याने देशातील इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन वेबसाईटनुसार पेट्रोलचा दर दिल्लीत प्रति लिटर ७५.६९ रुपये आहे. कोलकात्यात ७८.२८ रुपये, चेन्नईत ७८.६४ रुपये आहे. डिझेल प्रति लिटर ६८.६८ रुपये, मुंबई ७२.०२ रुपये, कोलकात्ता ७१.०४ रुपये तर चेन्नईत ७२.५८ रुपये आहे.
हेही वाचा-टाटा सन्सचे चेअरमन पद स्वीकारण्याला इच्छुक नाही, पण...