महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मिनी टाळेबंदीने सणासुदीत होणाऱ्या वाहन विक्रीवर होणार परिणाम -इक्रा

महाराष्ट्रात गुढी पाडवा आणि नवरात्रीला मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री होते. महाराष्ट्रात 13 एप्रिलला गुढी पाडवा व त्याचदिवशी नवरात्राला सुरुवात होत आहे. मात्र, राज्य सरकारने आठवडाखेर टाळेबंदीच्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. या

auto sales
वाहन परिणाम

By

Published : Apr 9, 2021, 8:55 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी टाळेबंदी लागू करण्याच्या निर्णयावर पतमानांकन संस्था इक्राने चिंता व्यक्त केली आहे. मिनी टाळेबंदीमुळे नवरात्र आणि गुढी पाडव्याला होणाऱ्या वाहन विक्रीवर परिणाम होईल, अशी शक्यता इक्राने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात गुढी पाडवा आणि नवरात्रीला मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री होते. महाराष्ट्रात 13 एप्रिलला गुढी पाडवा व त्याचदिवशी नवरात्राला सुरुवात होत आहे. मात्र, राज्य सरकारने आठवडाखेर टाळेबंदीच्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदीचाही समावेश आहे.

हेही वाचा-कोरोनाचा फटका; 22 वर्षानंतर पहिल्यांदाच देशातील इंधनाच्या मागणीत घसरण

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी आणि रविवारी कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे वाहन डीलर व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवावी लागणार असल्याचे इक्राचे उपाध्यक्ष आशिष मोदानी यांनी म्हटले आहे. ऐन सणात टाळेबंदी असल्याने वाहनांच्या विक्रीवर आणि ऑटी डीलरला मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. गेल्या वर्षभरापासून ऑटो डीलर यांना संघर्ष करावा लागला आहे. तात्पुरत्या काळासाठी महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल डीलरला अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

हेही वाचा-सोन्याच्या दरात घसरण; चांदी प्रति किलो 275 रुपयांनी महाग

पुण्यात मिनी लॉकडाऊन

ऑटो हब असलेल्या पुण्यात नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने शहरात मिनी लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. 30 एप्रिलपर्यंत अंशतः संचारबंदी आहे. तर शनिवार आणि रविवारी संपूर्ण संचारबंदी लावण्यात आली आहे.

ठाण्यात पूर्ण लॉकडाऊन

आज संध्याकाळी 8 वाजेपासून सोमवारी सकाळपर्यंत ठाण्यात पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. त्यासाठी ठाणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हॉलतिकीट शिवाय परीक्षार्थी दिसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच मॉर्निंग वॉक आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवरदेखील कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details