महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 6, 2019, 4:52 PM IST

ETV Bharat / business

बोगस कागदपत्रांचा 'असा'ही वापर; भामट्यांनी सरकारला लावला १० हजार कोटींचा चूना

बोगस 'इनपूट टॅक्स क्रेडिट' घेण्यासाठी ७ ते ८ हजार जीएसटी नोंदणींचा वापर करण्यात आला आहे. जीएसटी नोंदणीच्या दिलेल्या पत्त्यावर खात्री करण्यासाठी अधिकारी पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला आहे.

GST
संग्रहित - जीएसटी

नवी दिल्ली - तुम्ही महत्त्वाची कागदपत्रे कोणत्याही कामासाठी इतरांना देताना काळजी घ्या. कारण काही भामट्यांनी अनेकांची महत्त्वाची कागदपत्रे बोगस इनपूट टॅक्स क्रेडिटसाठी वापरली आहेत. यामधून त्यांनी सरकारला १० हजार कोटींचा गंडा घातला आहे.

वित्तीय मंत्रालयाच्या माहितीनुसार काही लोकांनी वस्तू व सेवा करासाठी दुसऱ्यांची कागदपत्रे दिली आहेत. सहज जाळ्यात येऊ शकतील, अशा लोकांना भामट्यांनी लक्ष केले. त्यासाठी त्यांनी कर्ज, बँक खाते अशा कामांसाठी देण्यात येणाऱ्या कागदपत्रांचा वापर केला आहे. तपास अधिकाऱ्यांनी तपास केला असता अशी अनेक बोगस आयटीसी दाव्यांची प्रकरणे समोर आली आहेत.

हेही वाचा-मारुती सुझुकी ६३ हजार ४९३ वाहने परत मागविणार; 'हे' आहे कारण

बोगस 'इनपूट टॅक्स क्रेडिट' घेण्यासाठी ७ ते ८ हजार जीएसटी नोंदणींचा वापर करण्यात आला आहे. जीएसटी नोंदणीच्या दिलेल्या पत्त्यावर खात्री करण्यासाठी अधिकारी पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला आहे. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार नव्या जीएसटी नोंदणीपैकी सुमारे २० टक्के नोंदणी बोगस आहे. जोखीम तपासणी व्यवस्थेमधून अनेक व्यापारी हे बनावट जीएसटीत सहभागी असल्याचे आढळून आले आहे. त्यांनी बनावट जीएसटी नोंदणीचा वापर करून आयटीसीचे बोगस दावे केले आहेत. प्राप्तिकर विभागाने त्यांची नोंदणी रद्द केली आहे.

कोणतीही कागदपत्रे ज्या उद्देशाने देत आहात, त्यावर तसा उल्लेख करण्यात यावा. जेणेकरून त्याचा बोगस कामांसाठी वापर करणे शक्य होणार नाही, असे प्राप्तिकर अधिकाऱ्याने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details