नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम आज दिल्लीमध्ये बैठक घेणार आहेत. या बैठकीला सचिव आणि महत्त्वाच्या मंत्रालयाचे वित्तीय सल्लागार उपस्थित राहणार आहेत. सीतारामन यांच्याकडून बैठकीत आर्थिक वर्ष २०१९-२० मधील भांडवली खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे.
अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि गुंतवणूक वाढविणे हा बैठकीमागील मुख्य उद्देश्य आहे. चालू आर्थिक वर्षातील भांडवली खर्चाचे नियोजन करण्यावरही बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरुच; मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८० रुपये!
काय आहे भांडवली खर्च-
जेव्हा भांडवल निर्मितीसाठी खर्च करण्यात येतो त्याला भांडवली खर्च म्हटले जाते. त्याचा आगामी काळात लाभ होतो. उदा. इमारतीचे बांधकाम
हेही वाचा-'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून जाहीर करण्याच्या ईडीच्या याचिकेला नीरव मोदीचा विरोध
निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी कॉर्पोट कर हा सुमारे ३५ टक्क्यावरून २५ टक्के करण्याचा निर्णय जाहीर केला. ज्या कंपन्या कोणतीही सवलत घेतल नाहीत, त्यांना २२ टक्के कॉर्पोरट कर लागू होणार आहे.
हेही वाचा-सणाच्या तोंडावर कांद्यापाठोपाठ महागले टोमॅटो; गृहिणींचे बजेट कोलमडणार