नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करामधील वाद सोडविण्यासाठी 'थेट कर विवाद से विश्वास' हे विधेयक लोकसभेत आज सादर केले. या विधेयकामधून ९.३२ लाख कोटी रुपयांच्या कर वादांवर तोडगा काढण्यात येणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून 'थेट कर विवाद से विश्वास' विधेयक लोकसभेत सादर - विवाद से विश्वास
नव्या कर विधेयकामधून विश्वास वाढीला लागेल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. ही योजना मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
नव्या कर विधेयकामधून विश्वास वाढीला लागेल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. ही योजना मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. या विधेयकामुळे सरकारचा कायदेशीर खर्च कमी होणार आहे. तसेच महसूल वाढण्यासाठी मदत होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.