नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा करताना कोरोना लस संशोधनासाठी स्वतंत्रपणे ९०० कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली आहे. हा निधी स्वतंत्रपणे जैवतंत्रज्ञान विभागाला देण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनाच्या लसीसाठी ९०० कोटींची केलेली तरतूद ही कोरोनाच्या लस निर्मिती आणि वितरणासाठी नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. त्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
संबंधित बातमी वाचा-आत्मनिर्भर भारत रोजगार योजना: गृहखरेदीवरील सवलतीसह या १२ महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांकडून जाहीर
दरम्यान, कोरोना महामारी व देशाची अर्थव्यवस्था संकटातून जात असताना केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून रोजगार वाढविण्यासाठी गृहखरेदी, १ हजारांहून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांसाठी सवलत, पंतप्रधान शहर आवास योजनेकरता अतिरिक्त निधी आदी १२ घोषणा करण्यात आल्या आहेत.