महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पतमानांकन संस्था फिचकडून जीडीपीच्या अंदाजात घट - फिच

आर्थिक वर्ष २०२० मध्ये ७.१ टक्के जीडीपी होईल, असा अंदाज फिचने केला होता. त्याऐवजी आर्थिक वर्ष २०२० मध्ये ७ जीडीपी होईल, असे फिचने म्हटले आहे.

फिच

By

Published : Mar 22, 2019, 5:02 PM IST

नवी दिल्ली - पतमानांकन संस्था 'फिच'ने वर्तविलेल्या देशाच्या सकल उत्पन्नाच्या अंदाजात बदल केला आहे. आर्थिक वर्ष २०१८ मध्ये देशाचा जीडीपी हा ७ नव्हे तर ६.८ टक्के असेल, असे फिचने म्हटले आहे.

आर्थिक वर्ष २०२० मध्ये ७.१ टक्के जीडीपी होईल, असा अंदाज फिचने केला होता. त्याऐवजी आर्थिक वर्ष २०२० मध्ये ७ टक्के जीडीपी होईल, असे फिचने म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरणात बदल करून फेब्रुवारी २०१९ मध्ये रेपोदरात ०.२५ टक्के कपात केली आहे. आरबीआय रेपोदरात आणखी ०.२५ टक्के कपात करेल, असा अंदाज फिचने केला आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर अधिक अनुदान दिले जाईल, असेही फिचने म्हटले आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details