हैदराबाद- टाळेबंदी आणि कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारला महसुली उत्पन्नात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने खर्च आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोणत्याही नव्या योजनांची घोषणा करू नका, अशा सूचना वित्त मंत्रालयाने सर्व विभागांच्यामंत्रालयाला दिल्या आहेत.
कोणत्याही नव्या योजना अथवा योजनेंतर्गत दुसऱ्या योजना जाहीर करू नये, असे वित्त मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे. या सूचना आत्मनिर्भर पॅकेज आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजना अशा विशेष योजनांसाठी लागू नाहीत.