नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात लढण्यासाठी आर्थिक प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या राज्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय वित्तिय मंत्रालयाने राज्यांना देण्यात येणारा ४६ हजार ३८ हजार कोटी रुपयांचा हिस्सा देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे.
कोरोनाच्या महामारीत प्रभावीपणे काम करण्यासाठी राज्यांना कर हिस्सा देत असल्याचे वित्त मंत्रालयाने ट्विट केले आहे. वर्ष २०२०-२१ मध्ये राज्यांना ७.८४ लाख कोटी रुपये केंद्राकडून राज्यांना कर हिश्यापोटी द्यावे लागतील, असा अर्थसंकल्पात अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
कोरोनाचे देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्राला २ हजार ८२४ कोटी ४७ लाख रुपये मिळणार आहेत. तर उत्तर प्रदेशला ८ हजार २५५ कोटी १९ लाख रुपये मिळणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे जीएसटीपोटी केंद्र सरकारकडे एकूण १६ हजार कोटी रुपये थकित आहेत. ते पैसे कोरोनाच्या संकटात तातडीने द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती.