महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

खूशखबर! २०१८-१९ वर्षाकरता ईपीएफवर मिळणार ८.६५ टक्के व्याजदर - संतोष गंगवार

गेल्या ३ वर्षात सर्वात अधिक ईपीएफवर व्याजदर मिळणार आहे.

प्रतिकात्मक

By

Published : Apr 26, 2019, 8:50 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्रालयाने ईपीएफ खाते असणाऱ्या कर्मचाऱ्यांना खूश करणारा निर्णय घेतला आहे. २०१८-२०१९ वर्षासाठी ईपीएफवर ८.६५ व्याजदर करण्याचा निर्णय ईपीएफओने घेतला आहे. याचा देशातील सुमारे ६ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना गेल्या ३ वर्षात सर्वात अधिक ईपीएफवर व्याजदर मिळणार आहे.

वित्तीय सेवा विभाग (डीएफएस) हा वित्त मंत्रालयाचा विभाग आहे. या विभागाने ईपीएफओच्या व्याजदरातील वाढीला मंजुरी दिली आहे. कामगार मंत्री संतोश गंगवार यांनी हा ईपीएफवरील व्याजदर वाढविण्याचा निर्णय फेब्रुवारीमध्ये घेतला. गंगवार हे ईपीएफओच्या केंद्रीय मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी २०१७-२०१८ मध्ये ईपीएफओचा व्याजदर हा ८.५५ टक्के होता. तर २०१६-२०१७ मध्ये ईपीएफओच्या व्याजदर हा २०१५ च्या तुलनेत कमी म्हणजे ८.६५ टक्के एवढा होता.

ABOUT THE AUTHOR

...view details