महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 30, 2021, 11:02 PM IST

ETV Bharat / business

सलग दुसऱ्या तिमाहीत अल्पबचत योजनांमध्ये व्याजदर 'जैसेे थे'

केंद्र सरकारकडून अल्पबचत योजनांवरील व्याजदर हे दर तीन महिन्यांना जाहीर करण्यात येतात. केंद्रीय अर्थमंत्रालयाने अल्पबजत योजनांचे तिमाही व्याजदर जाहीर केले आहेत.

अल्पबचत योजना
अल्पबचत योजना

नवी दिल्ली - केंद्र सरकारने सलग दुसऱ्या तिमाहीत अल्पबजत योजनांवरील व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. मागील तिमाहीत व्याजदरात कपात केल्याने केंद्र सरकावर टीका झाली होती. यावेळीही अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात टाळण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून अल्पबचत योजनांवरील व्याजदर हे दर तीन महिन्यांना जाहीर करण्यात येतात. केंद्रीय अर्थमंत्रालयाने अल्पबजत योजनांचे तिमाही व्याजदर जाहीर केले आहेत. मागील तिमाहीचेच व्याजदर हे 1 जुलै 2021 ते 30 जून 2021 पर्यंत लागू राहणार असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा-अमेरिकन कायद्याचा वापर केल्यावरून रवीशंकर प्रसादांचा ट्विटरला टोला

असे आहेत अल्पबचत योजनांवरील व्याजदर

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच वर्षांची बचत योजना आहे. या योजनेवर 7.4 टक्के व्याजदर लागू आहे. या योजनेत ज्येष्ठांना दर तीन महिन्यांना व्याज देण्यात येते.
  • बचत ठेवीवरील व्याजदर ४ टक्के आहे.
  • सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदर हा 7.6 टक्के आहे.
  • किसान विकास पत्र योजनेचा विकासदर हा 6.9 टक्के आहे.

हेही वाचा-सहमतीने संबंध ठेवल्याच्या फेसबुकवरील पुराव्याने बलात्काराच्या आरोपीला जामिन

या गटांसाठी अल्पबचत योजना महत्त्वाच्या-

अल्पबचत योजनांवरील व्याजदर तीन महिन्यांना बदलण्यात येतात. जर त्यामध्ये बदल नसेल तर ते दर वित्तीय मंत्रालयाकडून 'जैसे थे' ठेवण्यात येतात. अल्पबचत योजना, बँक, उद्योग आणि निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या असतात. तसेच शेतकरी, महिला यांच्यासाठी असलेल्या खास बचत योजनेमध्ये पैसे गुंतविलेल्या वर्गाचे व्याजदरातील निर्णयाकडे लक्ष लागलेले असते. दरम्यान, केंद्र सरकारने 2016 मध्ये अल्पबचत योजनांमधील व्याजदर हे सरकारी रोख्यांच्या व्याजाशी संलग्न असल्याचे जाहीर केले होते. बँकांचे व्याजदर कमी होत असताना अल्पबचत योजनांचे व्याजदर जास्त आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले होते.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने अल्पबचत योजनांवरील व्याजदर 1.1 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचे मागील तिमाहीत आदेश काढले होते. या निर्णयामुळे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पीपीएफसह विविध अल्पबचत योजनांवरील व्याजदर कमी होणार होते. निर्मला सीतारामन यांनी हे आदेश नजरचुकीने निघाल्याचे ट्विटवरून सांगत व्याजदर 'जैसे थे' राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details