महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

वित्त मंत्रालयाचा अर्थसंकल्पाकरिता 'द्राविडी प्राणायम सुरू, सोमवारपासून बाहेरील जगाशी संपर्क होणार बंद

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या ५ जुलैला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या ५ वर्षात सर्वात अधिक अर्थव्यवस्था मंदावली आहे.

वित्त मंत्रालय

By

Published : Jun 4, 2019, 5:06 PM IST

नवी दिल्ली - सत्तेत दुसऱ्यांदा आलेल्या एनडीए सरकारने अर्थसंकल्प तयार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. देशाचा अर्थसंकल्प अत्यंत गोपनीय असतो. ही गोपनीयता राखण्यासाठी नॉर्थ ब्लॉकमधील वित्त मंत्रालयाचे कार्यालय भेट देणाऱ्यांना आणि माध्यमांना सोमवारपासून बंद असणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या ५ जुलैला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या ५ वर्षात सर्वात अधिक अर्थव्यवस्था मंदावली आहे.


ही आहे अर्थसंकल्प तयार करणारी अधिकाऱ्यांची टीम-
सीतारमण यांच्या टीममध्ये केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती सुब्रमणियन हे आहेत. अर्थसंकल्प तयार करण्याच्या कार्यालयीन पथकाचे नेतृत्व हे अर्थव्यवहार मंत्रालयाचे सचिव सुभाष चंद्र गर्ग, आर्थिक व्यव सचिव गिरीश चंद्रा मुर्मु यांच्याकडे आहे. याचबरोबर महसूल सचिव अजय भुषण पांडे, डीआयपीएएम सचिव अंतनु चक्रवर्ती आणि वित्तीय सेवाचे सचिव राजीक कुमार हे अर्थसंकल्प तयार करणाऱ्या पथकाचे सुकाणू सांभाळणार आहे.


नॉर्थ ब्लॉकला कडेकोट पोलीस बंदोबस्त -
संपूर्ण अर्थसंकल्प गोपनीय राखण्यासाठी नॉर्थ ब्लॉकला सुरक्षा रक्षकांचा कडक बंदोबस्त असणार आहे. इलेक्ट्रॉनिक स्वीपिंग मशीन बसविलेली असतात. खासगी ईमेलच्या सुविधांसह बहुतेक कॉम्प्युटरची सेवा बंद केलेली असणार आहे. या कालावधीत मंत्रालयाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर सुरक्षा रक्षक असतात. तसेच गुप्तचर यंत्रणेसह दिल्ली पोलिसांचीही अर्थसंकल्प निर्मिती करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नजर असते.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या ५९ वर्षीय सीतारमण यांना अर्थसंकल्प सादर करताना मंदावलेली अर्थव्यवस्था, एनपीएची समस्या, बिगर बँकिग वित्तीय क्षेत्रातील संकट या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय खासगी क्षेत्रात गुंतवणूक, निर्यातीचे प्रमाण वाढविणे, कृषी क्षेत्रातील समस्या, वित्तीय फारसा खर्च न वाढविताना सरकारी गुंतवणूक वाढविणे या गोष्टींवर अर्थसंकल्पात लक्ष द्यावे लागणार आहे. लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जून ते २६ जुलैदरम्यान होणार आहे. अधिवेशनादरम्यान २०१९-२०२० या वर्षाचा आर्थिक सर्व्हे हा ४ जुलैला सादर केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रभारी केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयलयांनी १ फेब्रुवारीला हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details