नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पायाभूत प्रकल्पांसाठी १०२ लाख कोटी खर्च करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी नॅशनल पाईपलाईन इन्स्फ्रास्ट्रक्चर कार्यक्रमाची येत्या पाच वर्षात अमंलबजावणी केली जाणार आहे. ही माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली होती. या टास्क फोर्सने ७० भागीदारांशी चार महिन्यांच्या अल्पकालावधीत चर्चा करून विविध प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. पायाभूत प्रकल्पांच्या विकासाकरता आणखी ३ लाख कोटी रुपये गुंतविणार आहेत. पायाभूत क्षेत्राच्या प्रकल्पाचा केंद्र सरकार व राज्य सरकार प्रत्येकी ३९ टक्के खर्च उचलणार आहे. तर २२ टक्के खर्च खासगी क्षेत्राकडून करण्यात आहे. हे पायाभूत प्रकल्प उर्जा, रेल्वे, शहरी सिंचन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात असणार आहेत.
हेही वाचा-सलग चौथ्या महिन्यात पायाभूत क्षेत्राच्या उत्पादनात घसरण