महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सरकारी बँकांच्या प्रमुखांची निर्मला सीतारामन घेणार बैठक; बँक विलिनीकरणाची होणार चर्चा - Bank merger

रबीआयने रेपो दरात कपात केली असताना  बँकांनी कमी व्याजदरात ग्राहकांना कर्ज देण्यासाठी सरकार आग्रही आहे. याविषयाबाबत निर्मला सीतारामन या सरकारी बँकाच्या प्रमुखांशी बैठकीत चर्चा करणार आहेत.

निर्मला सीतारामन

By

Published : Sep 19, 2019, 2:26 PM IST

नवी दिल्ली - सरकारी बँकांच्या प्रमुखांची बैठक आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन घेणार आहेत. यामध्ये १० सरकारी बँकांच्या विलिनीकरणाशी निगडीत मुद्यांची चर्चा करण्यात येणार आहे. तसेच १ एप्रिल २०१२० पूर्वी विलिनीकरणाची तयारी पूर्ण करण्यासाठी नियोजनाची चर्चा केली जाणार आहे.

आरबीआयने रेपो दरात कपात केली असताना बँकांनी कमी व्याजदरात ग्राहकांना कर्ज देण्यासाठी सरकार आग्रही आहे. याविषयाबाबत निर्मला सीतारामन या सरकारी बँकाच्या प्रमुखांशी बैठकीत चर्चा करणार आहेत. एनपीएच्या प्रश्नावर तोडगा काढण्यावरही बैठकीत चर्चा होणार असल्याचे सूत्राने सांगितले.

हेही वाचा-सरकारी बँकांचे विलिनीकरण म्हणजे 'टू बिग टू फेल' या चुकीच्या युक्तीवादातून शिकण्याचा धडा

या बैठकीला बँकिंग सचिव राजीव कुमार.ए हे उपस्थित राहणार आहेत. तसेच घरापर्यंत बँकिंग सेवा, वित्तीय सेवा आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने १० बँकांचे ४ बँकांत विलिनीकरण करण्याचा ३० ऑगस्टला निर्णय घेतला आहे.

हेही वाचा-विलिनीकरणाला विरोध; सरकारी बँकांचे अधिकारी २६ सप्टेंबरपासून २ दिवसांच्या संपावर

असे होणार आहे सरकारी बँकांचे विलिनीकरण
१. कॅनरा बँक + सिंडिकेट बँक
२. युनियन बँक + कॉर्पोरेशन बँक + आंध्रा बँक
३. पंजाब नॅशनल बँक + ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स + युनायटेड बँक ऑफ इंडिया
४. अलाहाबाद बँक + इंडियन बँक

हेही वाचा-पंजाब नॅशनल बँकेसह दहा सरकारी बँकांचे विलिनीकरण ; निर्मला सीतारामन यांची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details