नवी दिल्ली - वित्त आयोगाने आर्थिक वर्ष २०२०-२१ चा अहवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना शुक्रवारी सुपूर्द केला. १५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह यांनी गुरुवारी राष्ट्रपतींना अहवाल सोपविला होता.
१५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह यांनी सदस्य आणि इतर अधिकाऱ्यांसह केंद्रीय अर्थमंत्र्यांना अहवाल सोपविला आहे. असे केंद्रीय वित्तमंत्रालयाने ट्विट केले आहे.
विकास योजनांसाठी करण्यात आलेल्या शिफारसींची माहिती आयोगाने गुरुवारी राष्ट्रपतींना दिली.
हेही वाचा-सेनगाव येथील व्यक्तीने लढवली नवी शक्कल; शिळ्या पोळ्यातून बनवतो पशूखाद्य
देशाच्या राष्ट्रपतींना घटनेतील २७० कलमान्वये २७ नोव्हेंबर २०१७ ला १५ व्या वित्त आयोगाची स्थापना केली आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ दरम्यान करण्यात येणाऱ्या योजनांसाठी शिफारसी मागविणे हा वित्त आयोग स्थापन करण्याचा उद्देश आहे.