महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सलग सहाव्यांदा ऑगस्टमध्ये निर्यातीत घसरण; व्यापारातील तुटीचे प्रमाणही कमी - gold import in August 2020

टाळेबंदीनंतरच्या फटक्यानंतरही देशातील निर्यात क्षेत्र सावरलेले नाही. दुसरीकडे आयातीचे प्रमाण कमी झाल्याने व्यापारी तूट कमी झाल्याने अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Sep 16, 2020, 1:17 PM IST

नवी दिल्ली -कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत नसताना निर्यात करणाऱ्या उद्योगांना अजूनही आर्थिक फटका बसत आहे. सलग सहाव्या महिन्यात ऑगस्टमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण झाली आहे. देशामधून होणाऱ्या निर्यातीचे प्रमाण ऑगस्टमध्ये जुलैच्या तुलनेत १२.६६ टक्क्यांनी घसरून २२.७ अब्ज डॉलर झाले आहे.

पेट्रोलियम, कातड्याची उत्पादने, अभियांत्रिकी माल, मौल्यवान रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीत ऑगस्टमध्ये घसरण झाली आहे.

हेही वाचा-चालू आर्थिक वर्षात देशाच्या विकासदरात ८ टक्क्यांच्या घसरणीचा एडीबीचा अंदाज

  • केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशाच्या आयातीतही ऑगस्टमध्ये घसरण झाली आहे.
  • ऑगस्टमध्ये २६ टक्क्यांनी आयात घसरून २९.४७ अब्ज डॉलर झाली आहे. त्यामुळे व्यापारातील तुटीचे प्रमाण कमी होऊन ६.७७ अब्ज डॉलर झाले आहे.
  • गतवर्षी ऑगस्टमध्ये १३.८६ अब्ज डॉलरची व्यापारी तूट होती.
  • खनिज तेलाची आयात ऑगस्टमध्ये ४१.५२ टक्क्यांनी घसरून ६.४२ अब्ज डॉलर झाली आहे.
  • सोन्याची आयात ऑगस्टमध्ये वाढून ३.७ अब्ज डॉलर झाली आहे. गतवर्षी ऑगस्ट २०१९ मध्ये सोन्याची एकूण १.३६ अब्ज डॉलरची आयात झाली होती.
  • एप्रिल ते ऑगस्ट कालावधीत निर्यातीचे प्रमाण २६.६५ टक्क्यांनी घसरून ९७.६६ अब्ज डॉलर झाले आहे. तर याच कालावधीत आयातीचे प्रमाण ४३.७३ टक्क्यांनी घसरून ११८.३८ अब्ज डॉलर झाले आहे.
  • एप्रिल-ऑगस्ट कालावधीत व्यापारी तूट ही २०.७२ अब्ज डॉलर झाली आहे.

कोरोना महामारीच्या संकटामुळे देशातील उद्योग आणि व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचाच परिणाम निर्यात व आयातीवर झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details