नवी दिल्ली – सलग तिसऱ्या महिन्यात देशाच्या निर्यातीत घसरण झाली आहे. भारताची मे महिन्यात निर्यात 36.47 टक्क्यांनी घसरली आहे. देशातून मे महिन्यात 19.05 डॉलरची निर्यात झाली आहे.
सलग तिसऱ्या महिन्यात निर्यातीला फटका; मे मध्ये 36.47 टक्के घसरण - Gold imports
पेट्रोलियम, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, मौल्यवान रत्ने आणि दागिने या क्षेत्रातून होणारी निर्यात कमी झाल्याचा एकूण निर्यातीला फटका बसला आहे.
पेट्रोलियम, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, मौल्यवान रत्ने आणि दागिने या क्षेत्रातून होणारी निर्यात कमी झाल्याचा एकूण निर्यातीला फटका बसला आहे. निर्यातीबरोबरच देशाच्या आयातीतही घसरण झाली आहे. देशात होणाऱ्या आयातीत मे महिन्यात 51 टक्क्यांनी घसरण होवून 22.2 अब्ज डॉलरची आयात झाली आहे. त्यामुळे व्यापार तूटीत घसरून ही 3.15 अब्ज डॉलर झाली आहे. तर एप्रिल महिन्यात व्यापार तूट ही 15.36 अब्ज डॉलर एवढी होती. ही आकडेवारी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केली आहे.
- एप्रिल ते मे 2020 दरम्यान निर्यात ही 47.54 टक्क्यांनी घसरून 29.41 अब्ज डॉलर झाली आहे. तर या तीन महिन्यांत आयात 5.67 टक्क्यांनी घसरली आहे. या तीन महिन्यांत 39.32 अब्ज डॉलर किमतीची आयात झाली आहे. एप्रिल ते मे महिन्यांच्या कालावधीत व्यापारी तूट ही 9.91 अब्ज झाली आहे.
- मे महिन्यात 3.49 अब्ज किमतीच्या खनिज तेलाची आयात झाली आहे. ही गतवर्षीच्या मे महिन्यातील खनिज तेलाच्या आयातीहून 71.98 टक्के कमी आहे. गतवर्षी मे महिन्यात 12.44 अब्ज डॉलरच्या खनिज तेलाची आयात झाली होती.
- सोन्याच्या आयातीत 98.4 टक्के घसरण झाली. मे महिन्यात 76.31 दशलक्ष किमतीच्या सोन्याची आयात झाली आहे.
दरम्यान, देशात २३ मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदी असल्याने देशातील अनेक उद्योग व व्यवसाय ठप्प राहिले आहेत. त्याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे.