नवी दिल्ली- सलग तिसऱ्या महिन्यात देशाच्या निर्यातीत घसरण झाली आहे. हे निर्यातीचे प्रमाण अंशत: 0.8 टक्के आहे. पेट्रोलियम उत्पादने, कातडी उत्पादने आणि सागरी उत्पादनांच्या निर्यातीत घसरण झाल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.
डिसेंबरमध्ये व्यापारी तूट वाढून १५.७१ अब्ज डॉलर आहे. तर आयातीचे प्रमाण ७.६ टक्क्यांनी वाढून ४२.६ अब्ज डॉलर असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये निर्यातीचे प्रमाण २७.११ अब्ज डॉलर होते. तर आयातीचे प्रमाण हे ३९.५ अब्ज डॉलर राहिले.
हेही वाचा-भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला सरकारची मंजूरी
- नोव्हेंबर २०२० मध्ये निर्यातीचे प्रमाण हे ८.७४ टक्क्यांनी कमी झाले आहे.
- एप्रिल ते डिसेंबर २०२०-२१ मध्ये निर्यातीचे प्रमाण १५.८ टक्क्यांनी घसरून २००.५५ अब्ज डॉलर आहे. तर एप्रिल ते डिसेंबर २०१९-२० मध्ये निर्यातीचे प्रमाण हे २३८.२७ अब्ज डॉलर होते.
- चालू आर्थिक वर्षात नऊ महिन्यांत आयातीचे प्रमाण २९.०८ टक्क्यांनी घसरले आहे. त्यामुळे भारत हा डिसेंबर २०२० मध्ये ठोक आयातदार देश ठरला आहे. त्याचबरोबर देशाची १५.७१ अब्ज डॉलर ही व्यापारी तूट झाली आहे.
- डिसेंबर २०२० मध्ये आयातीचे प्रमाण हे १०.३७ टक्क्यांनी घसरले आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरमध्ये आयातीचे प्रमाण ४४.४६ टक्क्यांनी घसरले आहे.
दरम्यान, कोरोना महामारीचा देशातील उत्पादन क्षेत्रावर परिणाम झाला आहे. तसेच कोरोनाने जगभरातून उत्पादनांची मागणी कमी झाली आहे.
हेही वाचा-भारत-ब्रिटन विमानसेवा ६ जानेवारीपासून सुरू - नागरी उड्डाण मंत्री