नवी दिल्ली -भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दर स्थिर ठेवले आहेत. मात्र, ही शेवटची वेळ नसेल, तर पुढील पतधोरणातही रेपो दर स्थिर राहण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ आणि बँकांचे वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत. आरबीआयला विकासदराबरोबर वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याची कसरत करावी लागणार आहे. कारण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अजूनही अर्थव्यवस्था रुळावर आलेली नाही.
आरबीआयने शुक्रवारी पतधोरण जाहीर करताना सलग सहाव्यांदा रेपो दर चार टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत बोलताना येस बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ इंद्रनील पन ईटीव्ही भारती बोलताना म्हणाले, की आरबीयआयकडून व्याज स्थिर राहण्याची शक्यता होती. पुढील मार्गदर्शनासाठीही स्थिती जैसे थे ठेवण्याची शक्यता होती. आरबीआयकडून विकासदराला चांगले प्रोत्साहन मिळण्याकरता हे धोरण जास्तीत जास्त काळ ठेवले जाऊ शकते. निवडक क्षेत्रात चलनाची तरलता असताना विकासाकडे झुकल्याचा आरबीआयने संदेश दिला आहे.
हेही वाचा-महामारीतही स्टार्टअपची चमकदार कामगिरी; १.१७ लाख रोजगाराची निर्मिती
आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अनघा देवधर म्हणाल्या, की आरबीआयची पतधोरण समिती एकमताने रेपो दर स्थिर ठेवण्याची अपेक्षा होती. मंदावलेला विकासदर आणि वाढती महागाई या पार्श्वभूमीवर रेपो दर स्थिर ठेवण्यात आल्याचे देवधर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
हेही वाचा-नीती आयोगाकडून बँक ऑफ महाराष्ट्राच्या खासगीकरणाची केंद्राला शिफारस