नवी दिल्ली- चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था सुधारण्याचा वेग अपेक्षेहून अधिक जास्त आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षात उंचावण्याची क्षमता असल्याचे मत देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले.
भविष्यातील अंदाजाबाबत मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम म्हणाले, की आपण सावधपणे आशावादी असले पाहिजे. कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेवर प्राथमिक परिणाम झाल्याने सावध राहावे लागणार आहे. सध्याच्या अनिश्चितेबाबत बोलताना ते म्हणाले, की तिसऱ्या व चौथ्या तिमाहीत सकारात्मक घडेल, असा अंदाज करणे कठीण आहे. पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत आपण सकारात्मकरित्या पाहिले आहे. ते अंदाजितप्रमाणे आपण पाहत आलो आहोत. अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने सावरत आहे. यामधून अर्थव्यवस्थेत उंचावण्याची क्षमता असल्याचे दिसते. तिसऱ्या महागाईत अन्नातील महागाईचे प्रमाण कमी होईल, असा त्यांनी अंदाज केला आहे. त्याकडे जवळून देखरेख करत असल्याचेही मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी म्हटले.