नवी दिल्ली - पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने पीएमसीचे अधिकारी आणि एचडीआयएलच्या प्रवर्तकांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य हे ३ हजार ८३० कोटींहून अधिक असल्याचे ईडीने म्हटले आहे.
ईडीचा दणका; एचडीआयएलसह पीएमसीच्या अधिकाऱ्यांची ३,८३० कोटींची मालमत्ता जप्त - सारंग वाधवा
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य हे ३ हजार ८३० कोटींहून अधिक असल्याचे ईडीने म्हटले आहे.
पीएमसी बँकेचा एमडी जॉय थॉमस याच्या नावावर आलेले मुंबई- ठाणे येथील ४ फ्लॅट जप्त करण्यात आले असून पुण्यात दुसऱ्या पत्नीच्या नावावर तब्बल ९ फ्लॅट असल्याची माहिती न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे. पीएमसी बँकेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी सोमवारी न्यायालयात राकेश वाधवन, सारंग वाधवान आणि वारीयम सिंग यांना हजर करण्यात आले. न्यायालयाने तीनही आरोपींच्या पोलीस कोठडीत १६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे खातेदारांना २५ हजार रुपयापर्यंत पैसे खात्यातून काढता येतात. भारतीय रिझर्व्ह बँकने ही मर्यादा वाढवून ४० हजार रुपयापर्यंत पैसे काढण्याची परवानगी पीएमसीच्या खातेदारांना दिली आहे.