नवी दिल्ली- सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेकायदेशीर पैसे हस्तांतरप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीने एसआरएस ग्रुपची २,५१० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये जमीन, व्यावसायिक प्रकल्प, शाळा, सिनेमा हॉल व बँकांमधील ठेवी आदींचा समावेश आहे.
एसआरएस ग्रुपने विविध कंपन्यांच्या नावाने बेकायदेशीर चल आणि अचल मालमत्ता मिळविल्याचे तपासातून समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे. ईडीने प्राथमिक आरोपपत्राच्या आधारावर एसआरएस ग्रुपविरोधात मनी लाँड्रिगचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर तपास करत अंमलबजावणी गुन्हा माहिती तक्रार (एसीआयआर) नोंदवून कारवाई केली आहे.