नवी दिल्ली -बँक घोटाळ्याप्रकरणीआंध्र प्रदेशमधील एका व्यावसायिकावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी)मोठी कारवाई केली आहे. स्थावर मालमत्ता आणि बँकेतील रक्कम अशी एकूण साडेसात कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. पोलपल्ली वेंकट प्रसाद असे या व्यावसायिकाचे नाव आहे.
मेलिओरा अॅसेट रिकन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीकडे डिपॉझिट केलेले 50 लाख रुपयांसह इतर मालमत्ता ईडीनेमनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसारजप्त केली. संबधित मालमत्ता आंध्र प्रदेशातील तनुकू, पश्चिम गोदावरी जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील इंडियन ओव्हरसीज बँकेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी सीबीआयने पीबीआर पोल्ट्री टेकचे व्यवस्थापक प्रसाद आणि इतर भागिदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.