महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अर्थव्यवस्थेत मंदी नाही; अनुराग ठाकूर यांचा दावा - Recession in India

सप्टेंबर २०१९ मधील औद्योगिक उत्पादन हे गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी होते. केंद्र सरकार गुंतवणुकीकरिता पोषकस्थिती करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता सतत सुधारणा करत असल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

Anurag Thakur
अनुराग ठाकूर

By

Published : Feb 4, 2020, 1:51 PM IST

नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्थेत मंदी नाही, असा दावा सरकारने केला आहे. आर्थिक वर्ष २०१४ ते २०१९ मध्ये भारताने जी-२० राष्ट्रसमुहात सर्वाधिक सरासरी विकासदर नोंदविल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केला.


केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात आर्थिक मंदी नसल्याचा दावा केला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार भारत हा जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेचा देश म्हणून स्थान आपले टिकविणार आहे. देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर हा आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये वाढून ५.८ टक्के होणार आहे. तर आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये चीनचा विकासदर वाढून ६.५ टक्के होणार आहे. पुढे अनुराग ठाकूर म्हणाले, की राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) आकडेवारीनुसार राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा सरासरी विकासदर हा २०१४ ते २०१९ मध्ये ७.५ टक्के राहणार आहे. हे जीडीपीचे प्रमाण 'जी २०' राष्ट्रसमुहामध्ये सर्वाधिक राहणार आहे.

हेही वाचा-अर्थसंकल्पानंतरचे आरबीआयचे पहिलेच पतधोरण; गुरुवारी होणार जाहीर

मंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कठीण स्थितीत आहे का, असा प्रश्न अनुराग ठाकूर यांना विचारण्यात आला. बहुतांश आंतरराष्ट्रीय संस्थांनी याला पुष्टी दिली होती. यावर उत्तर देताना अनुराग ठाकुर म्हणाले, औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) सुधारणा होवून नोव्हेंबर २०१९ मध्ये १.८ टक्के नोंद झाली. त्यापूर्वी सलग चार महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांकात घट झाली.

हेही वाचा-'वाहन उद्योगातील नोकऱ्या कमी झाल्याच्या आकडेवारीला पुष्टी नाही

सप्टेंबर २०१९ मधील औद्योगिक उत्पादन हे गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी होते. केंद्र सरकार गुंतवणुकीकरता पोषकस्थिती करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता सतत सुधारणा करत असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details