नवी दिल्ली- केंद्र सरकारने अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांची भारताचे कार्यकारी संचालक म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर निवड केली. भल्ला यांचा तीन वर्षांसाठी कार्यकाळ असणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीने अर्थतज्ज्ञ डॉ. सुरजित एस. भल्ला यांची (भारतीय) कार्यकारी संचालकपदी निवड केली आहे. सुरजित भल्ला हे पदभार स्विकारल्यापासून तीन वर्षे कामकाज सांभाळतील, असे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीने म्हटले आहे. सुबिर गोकर्ण यांचे गतवर्षी जूलैमध्ये निधन झाल्यानंतर हे पद रिक्त होते. यापूर्वी भल्ला हे पंतप्रधान नरेंद्र यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये होते. मात्र, त्यांनी काही कारणांनी राजीनामा दिला होता.