संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सादर होणार आर्थिक सर्वेक्षण अहवाल - अर्थसंकल्प
हा सर्वेक्षण अहवाल आज संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहापुढे मांडला जाईल.
नवी दिल्ली - दुसऱ्यांदा सत्तेत आलेले मोदी सरकार त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आज संसंदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एकदिवस आधी हा अहवाल संसंदेत मांडला जातो. हा सर्वेक्षण अहवाल आज संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांपुढे मांडला जाईल.
देशाच्या पहिल्या, पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेल्या निर्मला सीतारमण मार्च २०२० अखेर पर्यंतचा अर्थसंकल्प ५ जुलैला म्हणजे उद्या सादर करणार आहेत. यापूर्वी अर्थंमंत्री पियुष गोयल यांनी १ फेंब्रुवारी २०१९ ला २०१९-२० चे अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.