मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँक ही डिजीटल चलनाकरिता डिसेंबरपर्यंत कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. ही माहिती आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी. रवीशंकर यांनी शुक्रवारी दिली आहे.
आरबीआयच्या पतधोरण समितीने शुक्रवारी पतधोरण जाहीर केले. यावेळी आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी. रवीशंकर म्हणाले, की आरबीआय हे डिजीटल चलनाच्या शक्यतेबाबत अंतर्गत मुल्यांकन करत आहे. यामध्ये डिजीटल चलनाकरिता स्कोप, तंत्रज्ञान, वितरण यंत्रणा आणि वैध यंत्रणा यांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रीय मध्यवर्ती बँक ही चलन सुरू करणार आहे.
हेही वाचा-थरारक... खोल दरीच्या कठड्यावर लटकली बस, चालकाने प्रसंगवाधान राखून वाचवला प्रवाशांचा जीव
यापूर्वी विविध देशांकडून डिजीटल चलनाचा वापर सुरू-
डिजीटल चलन देशात टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचेही रवीशंकर यांनी 22 जुलैच्या भाषणादरम्यान सांगितले होते. यापूर्वीच चीनने डिजीटल चलन सुरू केले आहे. तर बँक ऑफ इंग्लंड आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक ही डिजीटल चलनाबाबत विचार करत आहे.